Skip to main content

I Quit .....

प्रकाशीत विभाग

सध्या वर्तमानपत्रात एकतरी विद्यार्थाच्या आत्महात्येची बातमी असते. आत्महत्येपासून विद्यार्थाला परावृत करण्यासाठी विविध उपाय राबवले जात आहेत. त्याच अनुसंघाने वर्तमानपत्रात प्रकाशित झालेली ही कविता जसीच्या तसी तुमच्या साठी.

काही तरी उणं असतं
काही तरी अधिक असतं
I Quit ... म्हणण्या इतपत
मित्रा .......
आयुष्य का वाईट असतं.....?

दोरीआड अडकलेल्या
श्वासात सगळं संपतच असं नाही
बाबांच बोट
आईची कुस
देवाच्या घरी मिळते असं नाही...

ईच्छा आशा अन, आकांशा
सार्‍या उरासी बाळगायला हवीत
नाही मिळालं काही
तरी हसत
नवी स्वप्न पहायला हवीत

मित्रा
I Quit... म्हणण्याआधी
मित्रांच्या मिठीत थोड रडून बघ
आयुष्य खरच सुंदर आहे
त्याला थोडस जगुन बघ...

तात्पुरत्या समस्यांवरती
कायमचे उपाय करू नका
आत्मह्त्या करून असे
भित्र्यांसारखे मरू नका

यश अपयश येत राहिल
अशी कच खाउ नका
क्षुल्लक क्षुल्लक गोष्टींसाठी
प्राणांच मोल देउ नका

आत्महात्य करून कुनाला
समस्यांचं उत्तर मिळालेलं नाही
तुम्ही तर विद्यार्थीच
अजुन जीवनही कळालेल नाही.

कवी: ....... माहित नाही.

सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्‍या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.