प्रेषक श्रेयस वार गुरु, 01/21/2010 - 16:07
प्रमुखघटक:
1 वाटी साबूदाणा, 1/2 वाटी दाणे, 2 बटाटे (उकळलेले), हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ चवीनुसार, तिखट धने, ओवा, शोप, गरम मसाला अंदाजे, तळण्यासाठी तेल.
वाढणी:
3 ते 4 जनांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:
30 मिनीटे
मार्गदर्शन:
सर्वप्रथम साबूदाण्याला 4 तास अगोदर भिजत घालावा. शेंगदाण्यांना वेगळे भिजवून जाडसर वाटून घ्यावे. उकळलेल्या बटाट्यांना साबूदाणा व दाण्याच्या कूटाबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे व बाकीचे सर्व साहित्य घालून एकजीव करावे. आता मिश्रणाचे चौकोनी काप करून, कढईत तेल गरम करून तळून घ्यावे. गरमा गरम पेटिसला कोथिंबीरने सजवून सॉस किंवा चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह करावे.
- आपल्या प्रतिक्रीया नोंदविण्या साठीयेण्याची नोंद करा किंवा नविन खाते उघडा
सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.