- 2 वाटी बासमती तांदूळ
- एक ते दिड वाटी साखर
- खोवलेला नारळ एक वाटी
- साजुक तूप 100 ग्रम
- खाण्याचा केशरी रंग
- विलायची पावडर आर्धा चमचा
- लवंग 10 ते 12
- काजू काप दोन चमच
- खिसमीस 15 ते 20 नग
तिन ते चार लोकांसाठी
15 मिनीटे.
प्रथम भात कुकरमध्ये मोकळासार शिजवून घ्यावा. भात मोकळा होण्यासाठी त्यामध्ये आर्धा चमच साजुक तूप टाकावे. नतंर कढईमध्ये एक चमचा तूप खालून गरम करुन व त्यात लवंगा टाकून परतवून घ्याव्यात. त्यामध्ये साखर टाकून व आर्धी वाटी पाणी मिसळावे व त्याचा पाक तयार कराव. त्यात खाण्याचा केशरी रंग आवडीनुसार टाकावा व त्यामध्ये शिजलेला भात टाकून मिसळुन घ्यावा त्या नतंर खवलेला नारळ मिसळावा. नतंर विलायची पावडर आर्धा चमचा, काजू काप दोन चमच,खिसमीस 15 ते 20 नग मिसळुन घ्यावेत. त्यामध्ये एक चमचा साजूक तूप मिसळावे. थंड झाल्यावर वाढावा.
भात जास्त पाणी टाकून / खुप वेळ शिजवू नये.
- आपल्या प्रतिक्रीया नोंदविण्या साठीयेण्याची नोंद करा किंवा नविन खाते उघडा
सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.