दुसरे दिवशी पून: आम्ही एकत्र जमलो असता भगवान शेटेनी ती तोफ आपणास आणता येईल काय असा प्रश्न निर्माण केला. हो आणता येईल त्यासाठी फार प्रयत्न करावे लागतील असे शिराढोणकर म्हणाले. मी म्हणालो त्या तोफेचा काय उपयोग होईल ? शिराढोणकर म्हणाले तोफेने रजाकार मारू रजाकारा तर नेहमी आपणाला त्रास देत आहेत. रजाकाराचे टोळकेच्या टोळके नेहमी होळीवरून जातात, शिव्या देतात, मारहाण करतात, त्यांचा बंदोबस्त होईल.
आमच्या बैठका मोकळया मध्ये चालू होत्या. दिवसभर उन, गरमी इतका कडक उन्हाळा असे बहुतेक रात्रौ 11 वाजता झोप येई उंच गच्चीवर थोडा वारा सूटला म्हणजे झोपे येई सकाळी 7 वाजे पर्यंत जाग येत नसे. दिवसभर प्रत्येकजण आप आपली कामे करत व पून: सायंकाळी 7 वाजता एकत्र जमत, आपआपल्या योजना मांडत व त्या प्रमाणे अंमलबजावणी करत.
तोफेचा विचार 4/5 दिवसापासून आम्हां तिघांच्या डोक्यात घोळत होता. त्यासाठी 4/5 माणसाचे काम नाही आणि ते दिवसा करावयाचे नाही हे ठरले.
तोफ आणण्यासाठी गाडीची आवश्यकता आहे आणि त्यासाठी हिरामण गवळी आमच्या गटातील आहे तो तयार करण्यासाठी त्याला विचारण्यात आले. प्रथम तो घाबरला म्हणाला कडबा वगैरे आणता येईल लहान शस्त्रास्त्रे आणता येतील. तोफे सारखी मोठी, अवजड वजनदार गाडीत कसे उचलून ठेवता येईल. गाडी जरूर देवू मी स्वत: बसेन गाडी हाकाला मी घाबरणार नाही परंतु तोफ उचलून ठेवणे फार भयंकर काम आहे. बैठक संपली.
आमच्या मनात तोफ उचलून गाडीत ठेवण्याचा प्रश्न सतावीत होता. त्यासाठी 20/25 माणसे लागतात. आमच्या गटामध्ये 18/20 तरूण असत ती सर्व जमली त्यांना तोफ उचलू गाडीत ठेवण्याचा प्रश्न मांडला. त्यातील एक जण म्हणाला हाताने तोफ उचलता येणे अवघड व कठीण जाईल व वेळ लागेल, तेव्हा मजबूत धांदी दोर्या आवश्यक आहेत. त्या धांदिने ठीक ठिकाणी त्या तोफेला घट्ट आवळून बांधता तर येईल व कांही दोर्या हातात धरण्यासाठी उचलण्यासाठी उपयोगी पडतील तेंव्हा धांदी दोरा आणण्याचे ठरले.
दुसरेच दिवशी तोफेला बांधण्यासाठी धांदी दोर आणले. शिराढोणकर, भगवानराव दुसरे दिवशी दिवसभर DSP आॅफीस च्या जवळ आजूबाजूला निरिक्षण करीत राहिले. साधारण रात्रौ 10 वाजेपर्यंत त्या मैदानात पोलिस फिरत असतात रात्रौ थोडा वेळ पत्ते खेळतात व झोपतात. रात्रौ 12 च्या पुढे सर्व सामसुम असते. तोफ मैदानात असते.
पुढे दोन दिवसानी हिरामणला गाडी घेवून जाण्यासाठी विचारणा केली तो तयार झाला. गाडीत तोफ ठेवायची ठरले पण गाडीतील तोफ कोणालाही दिसू नये यासाठी काय करावे, एक म्हणाला तोफेवर कपडा झाकू पण यामुळे उत्सुकता वाढेल काय आहे हे पाहण्याची इच्छा होईल. तर शेतात काम करणारा आमच्यात होता तो म्हणाला थोडा कडबा गाडीत पसरून टाकू व नंतर तोफ ठेवू आणि पून: जास्त कडबा तोफेवर व चहूबाजूस ठेवून झाकून काढू व दोयाने बांधू विचार बरोबर वाटला. त्या प्रमाणे ठरले.
आमच्या गटाला कार्य कोणत्या दिवशी करायचे हे सांगण्यात आले. अगोदर दिवसभर झोप काढायची व रात्री हे तोफ आणयचे कार्य करण्याचे ठरले.
तिकडे DSP आॅफीस च्या मैदानात रोज टेहळणी करण्याचे काम आम्ही 2/3 जण करीत असे.
ठरलेल्या दिवशी व वेळेवर आम्ही 19 जण जमा झालो. रात्रीचे 12 वाजले. हिरामण आपली गाडी कडब्यासह भरून तयार झाला गाडी गंजी, इतवारा, मोढा, गुरूद्वारा, वजिराबाद, मारवाडी धर्म शाळा करीत चालली. आम्ही 19 जण 2/3 दोन किंवा 3 जण मिळून ग्रुप करत चौक, मोंढा, वजिराबाद, धर्मशाळा करीत गोवर्धन घाटाकडे गंगेकडे गेलो. तिथे बराच वेळ थांबलो. गाडी अद्याप DSP आॅफीसच्या मैदानापर्यंत आली नव्हती. तो पर्यंत गाडीला मैदानात कोणत्या मार्गाने आणाव हे ठरविले. साधारण सव्वा दिड वाजला असावा चोहीकडे सामसुम आहे. पोलिस झोपलेले आहे कुणीही जागा नाही याची काळजी घेतली. ऐकमेकांनी कानातल्या कानात बोलावे आवाज काढू नये फक्त खूणा इषारे करीत रहावे. गाडी आली.
गाडीतला अध्र्याच्यावर कडबा गाडीच्या बाजूस आवाज न करता काढला. ज्या दोया धांदी आणल्या होत्या त्या थोडे तुकडे करीत ठीक ठीकाणी साधारण 15 ठिकाणी तोफेला बांधल्या. पक्या बांधल्या आहेत की नाही ते पाहिले. घट्ट आवळल्या ठरल्याप्रमाणे पुढे 10 मध्ये 6 आणि मागे 4 जण असे राहून दोर्या हातात धरून तोफ उचलून गाडीत ठेवली. तोफेचा वजनदार भाग बैलाकडू (जुवाकडे) ठेवला व दोर्या गाडीच्या सांटयाला बांधल्या परत कडबा तोफेवर व तोफेच्या बाजूला ठेवून पून: दुसया धांदीने बांधून आवळल्या. मैदानावर कडबा कांहीच राहू दिला नाही. पांचोळा वेचून बरोबर थैल्यात भरला गाडीत ठेवला थोडा वेळात मैदानाच्या बाहेर गाडी आली गाडीचा जो जाणाचा मार्ग होता तो थोडा बदलून मोठया रस्त्याने गाडी न आणता ज्या गल्लीतून बोळीतून गाडी आणता येईल व गाडीच्या पाठी मागे 2/3 दोघा तिघांचे गट थोडया थोडया अंतराने येणे चालू राहिले.
सकाळी 3.30 वाजता होळीवर कृष्ण मंिदराजवळ गाडी येवून थांबली.
सर्वांनी गाडीतील तोफेवरील व बाजूचा कडबा काढला तोफेला गाडीच्या साटयाला बांधले होते तेवढया दोर्या साटयापासून सोडल्या पून: सर्वांनी ती ठीक ठीकाणी बांधलेली तोफ गाडीच्या खाली उतरून दोर्यांनी धरून ती कृष्ण मंदिरातल्या अलिकडील आड असल्या अंगणात ठेवली रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीत तो काढलेला कडबा ठेवला हिरामणने गाडी जवळच असलेल्या घराकडे नेली.
इकडे तोफ आणलेल्यांचा आनंद आम्हां सर्वांना झाला फार मोठे कार्य केले व ते धाडसाने केले. सरकारच्या विरोधात केले म्हणून आम्हास स्फूरण चढले. परंतू आता मंदिराच्या अंगणात आणलेली तोफ मंदिराच्यावर कशी न्यावी याचा विचार आला. आम्ही 20 जण तिथेच होतो आणखी 5/6 जणाची आवश्यकता भासली म्हणून आम्ही ग्रुप जावून 7/8 जणाला आणले. पून: जास्त दोर्या बांधल्या अंगणात 3 जण थांबले आणि मंदिरावर पायर्या चढून जिन्यावर गेले. तोफेला बांधलेल्या दोर्याचे एक एक टोक जिन्याकडे फेकले त्या दोर्यावर गेलेल्या लोकांनी धरले परमेश्वराचे नांव मनात घेत सर्वांनी पूर्ण ताकत वापरून दोरा वर उचलत राहिले त्यामुळे तोफ जिन्यावर 4–30 पर्यंत पोहचली तिथे ती तोफ िजन्यावर दोर्यानी बांधून रस्त्याकडे तोंड करून ठेवली व बांधली व सर्वजण आपआपल्या घरी जावून झोपी गेले.
**** स्वातंत्रसैनिक प्रभाकरराव माणिकराव नांदुसेकर, नांदेड ****
---- क्रमश: ----
- आपल्या प्रतिक्रीया नोंदविण्या साठीयेण्याची नोंद करा किंवा नविन खाते उघडा
सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.