15 आॅगस्ट 1947 नंतर मराठवाडा किंवा निजामस्टेट येथील लोकांचे जीवन विशेषत: हिंदू समाज अस्थिर होते. रजाकारांचा धुमाकूळ, मुसलमांनाचा दहशतवाद, या मुळे सर्व चिंतीत होते. निजाम भारतात विलिन होण्यास विरोध करीत होता. मी त्यावेळेस नांदगावी होतो तेव्हा भारताच्या गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजाम संस्थांच्या भोवताली मिल्ट्री ठेवली होती. त्या मिलट्रीच्या सुचनेनुसार ते सैनिक कशा प्रकारे निजामाच्या हद्दीत प्रवेश करावा याची टेहळणी करत होते. मी व मित्र बाबुराव चौधरी काही काम नसल्यामुळे त्या मिल्ट्रीच्या नांदगाव कॅम्पकडे फिरावयास जात असे. आमची त्या सैनिकांशी ओळख झाली. गप्पा गोष्टी मुळे निजाम स्टेट च्या समाजाची परिस्थीती सांगितली. त्या कॅम्पपासून अजिंठा लेणी चा रस्ता होतो. तेथून लेणी बरीच अंतरावर होती. आम्हांस तेथ पर्यंत जाण्यासाठी त्या सैनिकांने विचारले आम्ही घरी जावून सूचना देवून येतो असे सांगितले. घरी जावून मी आईस विचारले आईने परवानगी दिली. सर्व सांभाळून जावून ये असे सांगितले. मी व बाबूराव चौधरी दोघेही नांदगावच्या मिल्ट्री कॅम्प जवळ गेलो. त्या मिल्ट्रीमनला सांगितले पाच दिवसाचा फिरून यायचा कार्यक्रम त्या मिल्ट्रीमनच्या अधिकार्याने दिला. प्रवासाचे सामान घेतले. बिस्किटचे पुडे व खाण्याचे सामान जीपकार मध्ये ठेवले. कपडे ठेवले. शस्त्रास्त्रे ठेवली. 3 मिल्ट्रीमन, आम्ही दोघे त्या कारमध्ये बसून प्रवासाला निघालो. रस्ता साफ नव्हता. ठिकठिकाणी वळण, काही झाडे असा डोंगराळ प्रवास सुरू झाला. फार लहान लहान खेडी लागली. रस्त्याने माकड, वानर तसेच रान डुकरेही पळताना दिसत होती. पहिला मुक्काम एका खेडयातच झाला. तेथे एका वंजाराच्या घरी जेवलो. त्या गृहस्थाने सर्व माहिती विचारली. परंतु मिल्ट्रीमनने स्वत:ची ओळख मिल्ट्रीमन म्हणून दिली नाही. दुसरेच सांगितले असे करीत करीत तो दिवस रस्त्याची माहिती घेवून अजंठा पर्यंतच्या सभोतालचा प्रदेश पाहून झाला. रस्त्याने ससे पळताना दिसत होते. मिल्ट्रीमनने रस्त्याच्या बाजूला जीप उभी करून ते तिघेही त्या माळ जंगलात गेले. त्या िदिवशी ससे मारून मारून आणून जीप मध्ये ठेवले. आम्ही तोपर्यंत त्या जीपच्या जवळच थांबलो होतो. 5 दिवस झाले पून: नांदगाव मिल्ट्री कॅम्प ला पोहचलो. घरी गेल्यानंतर प्रवास मजेशीर झाल्याचे सांगितले.
दोन दिवसानंतर अकोला करीत यवतमाळ जिल्हयात उमरखेड येथे आलो. इथेही नांदेडचे कांही लोक रहात होते. त्यांच्या भेटी घेतल्या. उमरखेड पासून थोडयास अंतरावर हदगावच्या जवळ निझाम सरकारची हद्द सुरू होते. इथेही सरहद्दीच्या जवळ उमरखेडहून 5 किलोमीटर अंतरावर भारत सरकारची मिल्ट्री होती तिथे ही जावून माहिती घेतली त्यांना ही रस्त्याची माहिती हवी होती. आम्ही दोघांनी त्यांना रस्त्यांची माहिती देण्याचे आश्वासन दिले. दुसया दिवशी त्यांच्या बरोबर 4 मिल्ट्रीमनने सैनिकी पोषाख न घालता जीपने प्रवास केला. हदगाव दाखविले वारंगा फाटया पर्यंतचा प्रवास केला तीथे रात्रीचा मुक्काम केला आणि परत उमरखेडला निघालो.
सैनिका बरोबर राहण्याचा आम्हांस अनुभव आला. तेथून वर्धा नागपूर करीत पुन्हा अमरावती, अकोला करीत चाळीसगांव करीत फिरत नाशिक जिल्हायात नांदगाव मुक्कामी आलो. इथे पोर्णिमा निमित्त नागवे जैन गुरू आले होते. त्या नागव्या जैन गुरूचे केश लोचनाचा कार्यक्रमासाठी जैन समाज जमला होता. एका उंच चौरंगावर जैन साधुला बसविण्यात आले होते. समोर एक मोठी परात बाजूस गंगाळ त्यात गरमपाणी व इतर भांडयात दही, दुध मध, गोमुत्र ठेवले होते. भोवताली पती पत्नी चे 15 ते 20 जोडपे उभे टाकल होते. त्यांच्यातील काही लोक मंत्र म्हणत होते, साधुच्या डोक्यावर पांढया रंगाचे भस्म अगर पावडर टाकीत होते. तर कांही लोक साधुच्या डोक्यावरचे केस लोचन (उपटीत) करीत होते. साधू निर्विकार बसले होते. ते पाहून हा काय नविन अजब प्रकार पाहून आम्हांस थोडे हसू येत होते. आमचे हसणे पाहून आंम्हा दोघांनाही आमच्या पाठीत दोन दोन थापडया मारल्या परंतु आम्ही पून: हसलो नाही. साधूना स्नान घालण्यासाठी जोडप्यांनी तांब्यामध्ये पाणी घातले. त्या आधी साधूच्या अंगावर दुध, दही, गोमुत्र, मध, लावून साधूंच्या शरीरावर स्वच्छ घासले. थोडे तेलही लावले व गरम पाण्याने साधूना आंघोळ (स्नान) घातली सर्व पाणी मोठया परातीत जमा झाले होते ते पाणी एका झाडाच्या बाजूस खोल जागा होती तेथे घातले. त्यानंतर साधुची पूजा केली. साधुच्या हातात मावेल एवढेच अन्न साधूना दिले. साधूने ते खाल्ले. अशा प्रकारचे दिवस फिरण्यात घालविले.
एके दिवशी मी नांदगावच्या एका घरी नांदेडचे कुटुंब राहत होते. त्या कुटुंबातील एका बाईस त्या घर मालकाने अश्लील शब्द वापरून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. ते मला सांगितले मी त्याबाईच्या नवर्यास प्रत्येक शब्द आल्यानंतर त्यांचा समाचार असे म्हणालो. घरी आल्यानंतर संध्याकाळी सांगितला. दुसरे दिवशी त्या बाईच्या पतीने बाकी भोवताली राहणार्या नांदेडच्या कुटूबांला सांगितले. नांदेडच्या लोकांना राग आला. सर्व नांदेडचे लोक एका ठीकाणी जमा झाले आणि त्या घर मालकाला बोलू लागले. विचारू लागले. त्या व्यक्तीने (घर मालकाने) प्रथम फार जोरात जमलेल्या लोकास दटावण्यास सुरूवात केली आणि एकेकास अशी धमकी दिली. त्या व्यक्तीचे सर्व भाषण ऐकून जमलेल्या लोकांना संताप आला. सर्वानी त्याचे हात पाय धरून त्यांला घराच्या बाहेर काढले. कांही लोकांनी त्याला हाताने थापडा मारल्या काहींनी थोबाडीत, पाठीत मारले. मग तो घाबरला आणि आपली झालेली चूक कबूल केली. यापुढे घरात राहण्याच्या किरायदारास त्रास देणार नाही असे लिहून घेतले. अशा प्रकारे नांदगावी आमची चांगली जरब बसली. नांदगावी दुध डेरीत काही नांदेडचे लोक काम करीत होते. त्या काम करणाया लोकांना नांदगावचे लोक कमी प्रितिचे समजून त्याचा अपमान करीत असत. परंतू कायमची चांगली जरब वरील प्रकरणामुळे पूर्ण गावात बसली आणि दुध डेरीत काम करणार्या लोकांना तेथील लोकांचा त्रास कमी झाला.
**** स्वातंत्रसैनिक प्रभाकरराव माणिकराव नांदुसेकर, नांदेड ****
---- समाप्त ----
- आपल्या प्रतिक्रीया नोंदविण्या साठीयेण्याची नोंद करा किंवा नविन खाते उघडा
सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.