भारत स्वातंत्र झाल्यानंतर निझाम सरकारच्या राज्यात रजाकारानी धुमाकुळ घातला स्त्रियांवर बलात्कार फार वाढले.स्त्रियांची नागवी धींड काढण्यात येवू लागली. कोणत्याही हिंदू व्यक्तीला विनाकारण मार देण्यात येवू लागला. रजाकारानी खेडोपाडी डाके घालण्यात उच्चांक गाठला. दर प्रती दिन दहशत वाढत गेली. कांही लोक सुरक्षीततेसाठी निझाम राज्याच्या बाहेर स्थलांतरीत झाले. त्यामुळे बाहेरचे लोक निझामी राज्यातील आलेल्या लोकांना निर्वासित म्हणू लागले. विशेषत: नाशिक जिल्हयात नांदगावात हे लोक राहू लागले. उमरखेड यवतमाळ जिल्हयात ही गेले. काही लोक पुणे येथेही गेले. हया निर्वासितांना मदत करण्यासाठी पुण्याचे लोक पुढे आले. त्यांनी हया लोकांना राहण्यासाठी धर्मशाळा काढल्या. त्यात राहणे व खाणे पिणे याची ही सोय केली होती. माझे कांही मित्र शंकर कुलकर्णी, भगवान शेटे असे आम्ही पुणे येथे तुळशीबाग वाले वकिल साहेब यांच्या धर्मशाळेत मुक्कामाला होतो. जेवण फुकट व राहण्याची सोय चांगली होती. दिवसभर कांहीच काम नसे पूणे येथील काही प्रेक्षणिय स्थळे पाहणे चालूच असे.
पर्वतीचा भाग, शनिवार वाडा, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी करमणूक म्हणून जावून बसत. शाळेतील अथवा, रजाकाराची धूमाकुळ या विषयी ही चर्चा, मराठी भाषेतील (मराठवाडा–पुणे) फरक याची चर्चा व घरगुती समस्या यांचा खल चालत असे. परंतु हे सर्व संभाषण हिंदी उदूर् मिश्रीत चालत असे. आमचे संभाषण मोठयाने असल्यामुळे सभोताली बसलेले कोणी एकतील यांची आम्हास काळजी नसे. तो काळ स्फोटक असल्यामुळे आम्ही उदूर्त बोलत असल्यामुळे पाकिस्थानी असावेत असा अंधूक संशय तेथील 8–12 ना आला. विशिष्ट ठिकाणी आम्ही बसून गप्पा गोष्टी करत असू आपण उदूर्तील भाषेचे आकलन त्याना होत नसे. अनेक वेळेला आमच्यावर पाळत ठेवली. एके दिवशी मी व माझा मित्र शंकर कूळकर्णी दोघेच गप्पा मारीत बसलो होतो. व शंकर कुळकर्णी पोट थोडे दूखू लागले म्हणून धर्मशाळेत निघून गेला. मला एकटयाला 8–9 ने गाठले व दटावले. तुमचा मनुष्य कोठे गेला विचारले. मी धर्मशाळेत गेला सांगितले. मला 8–9 यांने बरोबर चला म्हणून सांगितले, कोणीकडे काम आहे म्हणून विचारले. फक्त तुम्ही बरोबर चला असा दम दिला. मी थोडासा बुचकळयात पडलो व ही जबरदस्ती कशा साठी असा मनात विचार केला. शेवटी त्या 8 –10 च्या बरोबर गेलो. एका जीपकार मध्ये बसावयास सांगितले त्या बसलो. थोडयाच वेळात पुणेचे शिवाजीनगर न्यायालयात नेवून तिथे पोलिस प्रासीक्यूटर पुढे मला उभे केले. त्यांनी मला कांही प्रश्न विचारून एका फार्मवर माझी सही घेतली व तो पोलोस प्रासीक्यूटर कोर्टात गेला मी बसून राहिलो.
थोडया वेळानंतर कोर्टात मला न्यायाधीशा समोर उभे केले. न्यायािधशांनी मला प्रश्न विचारले त्यांची उत्तरे मी िदली. परंतु त्यांचे समाधान न झाल्यामुळे मला एका बेंचवर कोर्ट सुटे पर्यंत उभे राहण्यास सांगितले. मी हो म्हणालो आणि म्हटले फार वेळा पासून मला भूक लागली आहे. मला कांही खाण्यास दिले तर मी उभा राहू शकतो. न्यायाधीशांनी त्या पोलिस प्रासीक्यूटरला माझ्या जेवणाची व्यवस्था करण्यास सांगितले. कोर्टाबाहेर जवळच मला जेवण दिले व सोडून दिले. अशी ही पूण्याची आठवण स्मरणीय आहे.
**** स्वातंत्रसैनिक प्रभाकरराव माणिकराव नांदुसेकर, नांदेड ****
---- क्रमश: ----
- आपल्या प्रतिक्रीया नोंदविण्या साठीयेण्याची नोंद करा किंवा नविन खाते उघडा
सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.