Skip to main content

मेथीची भजी

प्रमुखघटक: 

दोन जुड्या बारीक मेथी, पाच-सहा हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, एक वाटी बेसन, थोडासा खाण्याचा सोडा, हळद, मीठ, एक मोठा कांदा, थोडी कोथिंबीर, तळण्यासाठी तेल.

वाढणी: 

3 ते 4 जनांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ: 

15 मिनीटे.

मार्गदर्शन: 

प्रथम मेथी निवडून, स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घ्यावी. एका भांड्यात मेथी, बारीक चीरलेला कांदा, बारीक चिरलेल्या मिरच्या, आलं, कोथींबीर आणि हळद टाकावी. त्यात बेसन आणि खाण्याचा सोडा टाकून चांगलं मिसळून घ्यावं. चवी नुसार मीठ घालावं. गरम तेलात साधारणपणे तपकरी रंगावर लहान लहान भजी तळावीत. साँस सोबत खायला द्यावीत.

सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्‍या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.