ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात आज गुरुवार दिनांक 5/11/2009, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ८१ चेंडूत १०० धावांची खेळी करत ४५ शतक पूर्ण केले. तसचे त्याने कारकिर्दीतील १७ हजार धावांचा टप्पा पार करत नवा विक्रम प्रस्थापित केला.
वयाच्या १९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सचिनने मजल दरमजल करत आज हा टप्पा गाठला आहे. सचिनने १८ डिसेंबर १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो आज आपल्या कारकिर्दीतील ४३५ वा एकदिवसीय सामना खेळत आहे.
सचिनच्या कारकिर्दीतील महत्त्वाची वैशिष्ट्ये :
एकदिवसीय कामगिरी :
४३५ सामन्यातील ४२३ डावात १७ हजार धावा
सर्वोत्तम खेळी नाबाद १८६, सरासरी ४४.२५
शतके - ४४ , अर्धशतके - ९१ , चौकार - १८५१ , षटकार - १७७ , झेल - १३२ , बळी - १५४, सर्वोत्तम ३२ धावांत ५ बळी, डावात पाच बळी दोन वेळा
हजारी धावांचे टप्पे :
१,००० धावा : ३६ व्या सामन्यात १९९२ मध्ये झिंम्बाब्वेविरुद्ध
२,००० धावा : ७३ व्या सामन्यात १९९४ मध्ये यूएईविरुद्ध
३,००० धावा : ९६ व्या सामन्यात १९९५ मध्ये श्रीलंकाविरुद्ध
४,००० धावा : ११५ व्या सामन्यात १९९६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध
५,००० धावा : १४१ व्या सामन्यात १९९७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध
६,००० धावा : १७६ व्या सामन्यात १९९८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध
७,००० धावा : १९६ व्या सामन्यात १९९८ मध्ये श्रीलंकाविरुद्ध
८,००० धावा : २१७ व्या सामन्यात १९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध
९,००० धावा : २४२ व्या सामन्यात २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध
१०,००० धावा : २६६ व्या सामन्यात २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध
११,००० धावा : २८४ व्या सामन्यात २००२ मध्ये इंग्लंडविरुद्ध
१२,००० धावा : ३१० व्या सामन्यात २००३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध
१३,००० धावा : ३३० व्या सामन्यात २००४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध
१४,००० धावा : ३५९ व्या सामन्यात २००६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध
१५,००० धावा : ३७६ व्या सामन्यात २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध
१६,००० धावा : ४०७ व्या सामन्यात २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध
१७,००० धावा : ४३५ व्या सामन्यात २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध
- आपल्या प्रतिक्रीया नोंदविण्या साठीयेण्याची नोंद करा किंवा नविन खाते उघडा
सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.