Skip to main content

बालेवाडी क्रीडानगरी सर्वांसाठी खुली

युवा राष्ट्रकुल स्पधेर्च्या निमित्ताने करोडो रुपये खर्चून अत्याधुनिक करण्यात आलेल्या बालेवाडी क्रीडानगरीचा वापर आता खेळाडूंबरोबरच सर्वसामान्यांनाही करता येईल. यासाठी क्रीडा विभागातफेर् वनडे आणि वाषिर्क मेंबरशिप योजना तयार करण्यात आलीय... येत्या दोन-तीन महिन्यांत त्याला सुरुवात होणार असून या योजनेचा लाभ राज्यातील सर्व मुलामुलींना तसेच नागरिकांना घेता येईल.

क्रीडानगरीत प्रथमच राबवण्यात येणाऱ्या या अनोख्या योजनेमध्ये माफक फीमध्ये इथल्या क्रीडा सोयीसुविधांचा वापर करता येणार आहे. मेंबरशिपच्या माध्यमातून जमा होणाऱ्या रकमेचा वापर क्रीडानगरीच्या देखभालीसाठी करण्यात येईल.

सर्वसामान्यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या वन डे मेंबरशिपसाठी ५० रुपये आकारण्यात येणार असून त्यामध्ये स्विमिंग, बॅडमिंटन, टेनिस, जिम्नॅशियम यापैकी एक-दोन सुविधांचा लाभ घेता येणार आहे. चार महिन्यांपूवीर् सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या महिनाभराच्या मेंबरशिप योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून त्याद्वारे आतापर्यंत दोन लाख रुपयांचे उत्पन्न क्रीडा खात्याकडे जमा झाले आहेत. वन डे आणि वाषिर्क मेंबरशिपच्या योजनांमध्ये क्रीडानगरीतल्या सर्व सुविधांचे एकत्रिकरण करण्यात येणार असल्याचे क्रीडा खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

क्रीडानगरीच्या परिसरात अनेक नवी हॉटेल्स सुरू झाली आहेत. त्यापैकी हॉटेल मेरियट, सेंट लॉर्न, विड्स यांच्याबरोबर क्रीडा विभागाने रोलिंग मेंबरशिप केली आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये मुक्कामास असणाऱ्यांना क्रीडानगरीतल्या सुविधांचा वापर करता येणार असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

क्रीडानगरीच्या देखभालीसाठी दर महिन्याला सुमारे ५० लाख रुपये खर्च येतो, त्यामध्ये १९ ते २० लाख रुपये लाइट बिल, पाच लाख रुपये पाण्याचे बिल आणि हाऊसकिपिंग व सुरक्षा यंत्रणेवर खर्च होणारे १३ लाख रुपये, रोजंदारी कामगारांचा पगार आणि इतरखर्चाचे आठ लाख रुपये यांचा समावेश आहे. क्रीडानगरीच्या वाषिर्क देखभालीची रक्कम सहा कोटी रुपयांपर्यंत जाते. त्यामध्ये राज्य सरकारकडून देखभालीसाठी एक कोटी १० लाख रुपयांचा निधी मिळतो. क्रीडानगरीच्या आवारात असणाऱ्या ऑचिर्ड हॉटेलकडून वर्षाला अडीच कोटी रुपये मिळतात. देखभालीसाठी आवश्यक असणारी उर्वरित रक्कम क्रीडास्पर्धा आणि इतर कार्यक्रमातून मिळणाऱ्या भाड्यातून जमा होते.

सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या मेंबरशिपच्या योजनेतून देखभालीसाठी आवश्यक असणारी रक्कम जमा होण्यास मोठी मदत होणार आहे.

माहितिचा स्त्रोत: मटा

सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्‍या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.