प्रेषक श्रेयस वार Wed, 10/21/2009 - 10:42
लसूणघास हे सरासरी दोन ते तीन फूट उंच वाढते, यास भरपूर फुटवे येतात. दरवर्षी या पिकाच्या १२ ते १५ कापण्या मिळतात. वार्षिक, हंगामी जातींपासून पाच ते सहा कापण्या मिळतात. या पिकात प्रथिनांचे प्रमाण चांगले असल्याने जनावरे हा चारा आवडीने खातात.
एकदलवर्गीय चारा पिकांमध्ये मका, ज्वारी, बाजरी, नेपिअर गवत, तर द्विदल वर्गीय चारा पिकांमध्ये लसूणघास, बरसीम, चवळी, स्टायलो, दशरथ गवत इत्यादी पिकांचा समावेश होतो. द्विदलवर्गीय चारापिकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त (१६ ते २० टक्के) असल्यामुळे दुधाळ जनावरांच्या आहारामध्ये या पिकांचा समावेश असणे फारच गरजेचे आहे.
आधिक माहितीसाठी वाचा
- आपल्या प्रतिक्रीया नोंदविण्या साठीयेण्याची नोंद करा किंवा नविन खाते उघडा
सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.