Skip to main content

निष्पर्ण वृक्षावर पक्षी घरटी नाही बांधत !!

प्रकाशीत विभाग

किती वर्षापासून तो वृक्ष उभा
निष्पर्ण !उघडा!!
पर्णहीन म्हातारा खंगलेला
निष्पर्ण वृक्षावर पक्षी येत नाही वस्तीला
नाही बांधत आपल्या पिल्लासाठी घरटे
वृक्ष आसुसलेला पक्ष्यासाठी !!
बांधारे घरटे माझ्याअंगण-फांदीवर
फुकट देतो फक्त येऊन राहा .
बांधा घरटे.
रात्रीची तेवढीच मला सोबत
भीती वाटतेरे मला एकटेपणाची
एके दिवशी माणसांची जमात मला नष्ट करतील
नि नेतील मला जाळायला

पण पक्षी येतात.
ऐन हिवाळ्यात
ओळीने बसतात
सुंदर कोवळे उन पाठीवर घेतात
उबेसाठी बसतात
मस्त शेपट्या हलवीत शिळ घालतात
दुपार झाली की उडून जातात
ही पाखरे ....!!
रात्रीची वस्तीला नाही येत
वृक्ष बिचारा एकटा मुकाट
निष्पर्ण वृक्ष टकाटका आठवीत बसतो
आपल्या गतकाळाच्या वेंभावाला

गरम उष्ण उन्हाळा झेलत असतो
मुकाटपणे आपल्या देहाची चिंधी बघत
कधीपण वनवा लागू शकतो
संपलेल्या भूतकाळाच्या
हिरव्या क्षणाच्या आठवणीला

म्हातारी माणसे अशीच असतात
त्या निष्पर्ण वृक्षासारखी
परदेशी गेलेल्या मुलाची वाट बघत
जुन्या आठवणीना कुरवाळीत
यारे या !!
आनंदाचा एक क्षण
राखून ठेवलाय तुमच्या साठी !!

निष्पर्ण वृक्षावर पक्षी घरटी नाही बांधत
नाही येत ती वस्तीला ....!!!!

सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्‍या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.