Skip to main content

दुधी भोपळ्याचा मुरब्बा

प्रमुखघटक: 

दुधी भोपळ्याचा कीस ३ वाटय़ा, कैरीचा कीस १/२ वाटी, साखर ३-१/२ वाटय़ा, वेलची पूड २ चमचे, केशरकाडय़ा १/२ चमचा.

वाढणी: 

3 ते 4 जनांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ: 

साधारण 1 तास

मार्गदर्शन: 

प्रथम दुधी भोपळा व कैरी वेगवेगळे किसून घेऊन नंतर एकत्र करणे व त्यात साखर घालून १० मिनिटे तसेच ठेवणे, साखर हळूहळू विरघळू लागेल नंतर गॅसवर ठेवून उकळणे. साधारण एकतारी झाला असे वाटले की गॅस बंद करून त्यात केशर व वेलची पूड एकत्र करून थंड झाल्यावर बाटलीत भरणे.

टीपा: 

दुधी भोपळा प्रकृतीने थंड असल्यामुळे उन्हाळ्यात अतिशय उत्तम.

सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्‍या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.