महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रमुख पीठ म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी, छत्रपती शिवराय आणि समर्थ रामदासांची 'कुलस्वामिनी', रामाची 'वरदायिनी', भक्तांच्या हाकेला धावून जाणारी 'त्वरिता' उर्फ 'तुकाई'. भक्ती आणि शक्तीचा अविष्कार असणाऱ्या तुळजाभवानी मातेचा नवरात्र महोत्सव कोजागिरीपर्यंत चालतो.
तुळजापूर हे उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून २२ किमी तर सोलापूर या जिल्हा केंदापासून ४४ किमी अंतरावर आहे. कृत युगाच्यावेळी 'कर्दम' ऋषींची पत्नी 'अनुभूती' हिच्याबद्दल 'कुन्कुर' नावाच्या दैत्याला अभिलाषा उत्पन्न झाली. तिच्या पातिव्रत्याच्या भंग करण्याचा त्याने प्रयत्न करताच देवी पार्वतीही त्वरीत धावून आली. तिने दैत्याचा नाश केला. त्वरित धावून येणारी म्हणून ती त्वरिता किंवा मराठीत तुळजा या नावाने तुळजापूरची देवी माहीत झाली. छत्रपती शिवाजी महाराजांना सुराज्याच्या स्थापनेसाठी देवीने भवानी तलवार दिली असं म्हणतात. त्यामुळे महाराजांनीही तिला कुलस्वामिनी मानून, तिची प्रतापगडावर प्रतिष्ठापना केली.
बालाघाट डोंगराच्या सान्निध्यात असलेलं तुळजाभवानीचं हे मंदिर अतिप्राचीन असून, मंदिराची बांधणी हेमाडपंथी आहे. देवीची मूतीर् गंडकी शिळेची असून, ती अष्टभुजाधारी आहे. हातात भाला, त्रिशूल, शंख, वज्र, सुदर्शन चक्र आहेत. तुळजाभवानीची मूतीर् चल असून, ती वर्षातून तीन वेळेस सिंहासनावरून हलवली जाते. इतर कोणतीही देवता अशा रीतीने सिंहासनावरून हलवण्यात येत नाही. भादपद वद्य अष्टमीला नवरात्रापूवीर् प्रथम ही मूतीर् हलवण्यात येऊन अश्विन शुद्ध प्रतिपदेस पुन्हा स्थानापन्न करण्यात येते. दसऱ्याला सीमोल्लंघन केल्यानंतर पुन्हा विजयादशमी ते कोजागिरी पौणिर्मेपर्यंत ती मंचकी निदेत असते. तसंच पौष शुद्ध प्रतिपदेपासून पौष अष्टमीपर्यंत पुन्हा ती शेजघरात निदिस्त असते.
तुळजाभवानीच्या प्राचिनतेचा पुरावा देणारा १४ नोव्हेंबर १३९८चा शिलालेख उपलब्ध आहे. तुळजाभवानीचं मंदिर हे सोळाशे वर्षांपूवीर्चं असल्याचं सांगितलं जातं. तुळजाभवानीची मूतीर् मंदिरात असली, तरीही तुळजाभवानीची प्रतिकृती असणारी मूतीर् धाकटं तुळजापूर इथं आहे. तुळजापूर इथे आश्विन शुद्ध प्रतिपदेस नवरात्र महोत्सवास प्रारंभ होतो. तत्पूवीर् भादपद कृष्ण अष्टमीच्या दिवशी सायंकाळी देवीची महापूजा झाल्यानंतर देवीजींची मंचकी निदा सुरू होते.
अश्विन शुद्ध एक हा दिवस घटस्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देवीला पहाटे सिंहासनावर आरुढ केले जाते. आणि दुपारी बारा वाजता विधिवत घटाची स्थापना केली जाते. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात दोन वेळा अभिषेक पूजा होते. आश्विन शुद्ध नवरात्रीच्या रात्री या परिसरातील लोक रात्री जागरण करतात. रात्रभर भक्तीगीते आळवून देवीची उपासना करतात.
नवमीच्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यातील बुऱ्हानगर इथून देवीची पालखी आणि भिंगार इथून पलंगपालखी तुळजापूरला येते. विजयादशमीच्या दिवशी पहाटे बुऱ्हानगरच्या पालखीने मंदिरात प्रवेश केल्यानंतर देवीच्या प्रतिमेस १०८ नऊवारी साड्यांचं वेष्टन दिलं जातं. याला 'दिंड' म्हणूनही संबोधण्यात येते. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनानंतर भिंगार इथून आलेल्या पलंगावर देवीजी पुन:श्च निदाधीन होतात. आश्विन शुद्ध पौणिर्मेपर्यंत म्हणजेच कोजागिरी पौणिर्मेपर्यंतचा हा कालावधी असतो. या दरम्यान ज्या पालखीत तुळजाभवानीची प्रदक्षिणा निघते, ती पालखी होमकुंडात जाळली जाते आणि पालखीचा दांडाच फक्त परत घेऊन पालखीचे मानकरी परत जातात. कोजागिरीपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात सहभागी होणाऱ्या भक्तगणांच्या स्वागताला तुळजापूर सज्ज झालेलं असतं.
- आपल्या प्रतिक्रीया नोंदविण्या साठीयेण्याची नोंद करा किंवा नविन खाते उघडा
सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.