Skip to main content

ज्वारीच्या कण्या

प्रमुखघटक: 

ज्वारी 2 वाट्या
ताक
मीठ

वाढणी: 

2 ते 3 जनासाठी

पाककृतीला लागणारा वेळ: 

15 मिनीटे

मार्गदर्शन: 

प्रथम ज्वारी जाडसर दळून घ्या. दळलेली ज्वारी रात्रभर ताकात भिजत घाला.
कण्या बनवण्याची पध्दत:
पातेल्यात आवश्यकतेनुसार पाणी गरम करून घ्या. पाण्याला ऊकळी आली की त्या पाण्यात ताकात भिजवलेले ज्वारीचे जाडसर पीठ मिसळा. चवी नुसार त्यात मीठ घाला. एक ऊकळी आली की पातेले उतरवून घ्या. गरम गरम कण्या, साजूक दूधासोबत खाण्यास वाढा.

टीपा: 

जसा रव्याचा उपमा बनवतो त्याच प्रमाणे कण्या बनवता येतात. पुर्वी मराठवाड्याच्या ग्रामीण भागात हे खाद्य आवडीने बनवले जात असे.

सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्‍या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.