Skip to main content

चारोळ्या

प्रकाशीत विभाग

//1//

भावनेचे बंध सारे,
नित्य तोडित गेलो.
मीच माझ्या आयुष्याला,
क्षणोक्षणी जाळीत गेलो.

//2//

सांज वेळी जमतील सारी,
प्रितीची पाखंरं.
होता पहाट तोडून बंध,
उडतील पाखंरं.

//3//

वाचु दे मला प्रिये,
गीत डोळ्यांत प्रितीचे.
पाहू दे ओठांवरी,
चांदणे रात्रीचे.

//4//

राजकारण्यांची जमात,
सरकारचे दामाद.
जनतेच्या पैश्यावर,
हात मारती तावातावात.

//5//

करोडोंचे घोटाळे करून,
आता आम्ही दमलोय फार.
देशाचे वाटोळे करुन,
आता आम्ही शिनलोय फार.

सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्‍या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.