चित्रपटसृष्टीतल्या अमूल्य योगदानाबद्दल ऑस्कर विजेते ज्येष्ठ गीतकार गुलजार यांना ‘ ओशियन्स-सिनेफॅन फिल्म ’ चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २४ तारखेला, ओशियन्सच्या ११ व्या आशियाई आणि अरब चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनावेळी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
एखादं अत्यंत संवेदनशील, धीरगंभीर गाणं असो किंवा अगदी उडत्या चालीचं, धमाकेदार गाणं असो, ते तितक्याच सहजतेनं साकारणारे गुलजार म्हणजे बॉलिवूडमधलं एक आदरणीय व्यक्तिमत्त्व. आजवर अनेक गाण्यांसाठी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय. ‘ जय हो ’ साठी तर त्यांना सर्वोच्च ऑस्कर पुरस्कारही जाहीर झालाय. सांस्कृतिक, भाषिक आणि कुठल्याही सीमा त्यांच्या गीतांच्या आड आल्या नाहीत. आँधी, परिचय, मौसम, माचिस हे समीक्षकांनी गौरवलेले चित्रपट गुलजारांनी दिग्दर्शित केले आहेत.
गुलजार यांनी सिनेक्षेत्रात केलेलं काम निश्चितच गौरवास्पद आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊनच ‘ ओशियन्स ’ नं आपल्या जीवनगौरव पुरस्कारासाठी गुलजार यांच्या नाव निश्चित केलंय. गेल्या वर्षी मृणाल सेन यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
- आपल्या प्रतिक्रीया नोंदविण्या साठीयेण्याची नोंद करा किंवा नविन खाते उघडा
सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.