कामळज भाग - 2: सण आणि उत्सव
पुर्वी गावी प्रत्येक सण मोठ्या उत्सहात साजरे व्हायचे. खर्या अर्थान श्रावणात सणांची लगबग सूरू व्हायची. सुरवात व्हायची ती नागपंचमी पासून. नागपंचमीला मारोतीच्या मंदीरासमोरील झाडावर झोके बांधले जायचे. गावातील सर्व लहाण - मोठे, बायका-पोरी झोके खेळण्यासाठी या ठिकाणी एकत्र येत. नागपंचमीत बायकांचा दुसरा खेळ म्हणजे भुलोबा. संध्याकाळच्या वेळी गावातील बायका जंगमाच्या घरासमोर भुलोबा मांडत. भुलोबाच्या भोवताली गोल रिंगन करून गाणी गात असत. हा भुलोबा नगपंचमीच्या अगोदर आठ-दहा दिवस चालत असे.
आमच गाव जवळपास एखादा अपवाद वगळता सर्व महानुभाव पंथाचे अनुयायी. म्हणजे श्री कृष्णाची पुजा करणारे. त्यामूळे श्री कृष्ण जन्माष्टमी जोरात साजरी व्हायची. प्रत्येक घरात तळणं व्हायची. पाहूण्यांला आमंत्रण जायचे आणि जन्माष्टमी निमीत्त्य प्रत्येक घरी जेवणावळी झडायच्या.
गाव आणि पोळा यांच एक विशेष नांत असे. पोळ्यासाठी गावातील सर्व लोक आपापल्या बैलांना नदीवर नेवून स्वच्छ धुवून, त्यांच्या शिंगाना वेगवेगळ्या रंगानी रंगवले जायचे. पाठीवर झुल आणि गळ्यात घुंगुरमाळा चढवल्या जायच्या. मारोती मंदिर आणि श्री दत्तात्रयाच्या मंदिरासमोर भल मोठे तोरण बांधल जायचे. गावातील मानाचे बैल सुरूवातीला हे तोरण तोडून मंदिराला पाच प्रदिक्षणा घलायचे.नंतर गावातील सर्वांचे बैल मंदिरा भोवताली फिरवले जायचे. घरी आल्यानंतर बैलांच आणि गाईंच लग्न लावल जायच. त्या साठी खास पुरणपोळीचं जेवण तयार असायचं. वर्षभर राब-राब राबनारे बैल त्या एका दिवसापुरते राजा बनायचे.
भाद्रपद महिण्यात येणारे गणेश चतुर्थी आणि गैरी पुजन तेवढ्याच उत्सहात साजरे व्हायचे. दसर्याच्या निमित्तांन घरांना रंग-रंगोटी केली जायची. दसर्याच्या आदल्या दिवसी गावातील सर्व लोक आपापल्या शेतावर जावून पांढवाच पुजन करत. शेतातच जेवन बनवून पुजा केली जायची. दसर्या नंतर येणारी दिवाळी जोरात साजरी व्हायची. लहान मोठे सर्वांसाठी नवीन कपडे खरेदी असायची. सासुरवासीनी मूली दिवाळीसाठी माहेरी जमा होत. दिवाळीचे पाच दिवस धमाल असायची.
गावाकडचा दुसरा लक्षात राहण्यासारखा सण म्हणजे होळी. होळीच्या महिना पंधरा दिवस आधी उन्हाळ्यामूळे शाळेला दुपार नंतर सुट्टी असायची. दुपारी घरी आल्यानंतर गावातील सर्व मूल एकत्र जमायचे. दुपारी सगळ्यांची झोपेची वेळ साधून गवर्या चोरून मारोतीच्या पाराजवळ गोळा करून ठेवायच्या. एकदा का त्या मारोतीच्या पाराजवळ येवून पडल्या की मग कुनीहि त्या गवर्या परत नेत नसत. होळिच्या दिवसाप्रयंत बर्याच गवर्या गोळा होत असत. होळिच्या दिवसी मग जमवलेल्या गवर्यांची होळी पेटवली जायची. एकमेंकांच्या नावान मनसोक्त बोंब मारली जायची. होळिच्या दुसर्या दिवसी धुळवड साजरी व्हायची. सगळा गाव रंगात रंगून निघायचा. चुकून कुनी पाहूणा आलेला असेल तर मग त्याची काही खैर नसायची. पाहूण्याला नखाकेशात पार रंगवून त्याची गाढवावर बसून वरात काढली जायची. मग दुपार नंतर नदीवर जावून आंघोळी उरकल्या जायच्या.
चैत्र र्पोणिमेला हनुमान जयंतीला गावची यात्रा भरते. यात्रेत गावाचं आराध्य दैवत म्हणजेच श्री दत्तात्रय प्रभुची पालखी निघते. दुपारी कुस्त्यांचा फड रंगायचा. आजू-बाजुच्या गावचे सर्व मल्ल कुस्ती खेळण्यासाठी हजर असत. जो कुनी शेवटी कुस्ती जिंकेल त्याचा नावाचा आजुबाजुच्या दहा-बारा कोसात गाजावाचा व्हायचा. गावच्या सर्व सासूरवासीनी यात्रेच्यानिमित्तांन गावी यायच्या. वर्षभर थोडे-थोडे करुन साठवलेले पैसे यात्रेत खर्च करायच्या. यात्रेचं मुख्य आर्कषण म्हणजे नाटक. पुर्वी गावकरीच नाटक बसवत. नाटक तीन अंकी असे पण रात्रभर चाले. तांबड फुटायला आल की नाटक बंद होई. यात्रेच्या दोन-आडीच महिणे आगोदर नाटकाची तालीम चाले.
गावातील जातीय सलोख्याच प्रतीक असलेला सण म्हणजे मोहरम. गावात जी काही चार मुसलीम घर होती ते हा सण सर्व गावर्यासोबत साजरा करत. पुर्वी मोहरम पाच दिवस चाले. पाच दिवस मोहरमाचे देव बसलेले असत. रोज संध्याकाळी धुल्ला खेळला जायाचा. त्या पाच दिवसात मोहरमची सवारी असायची. काही लोकांच्या अंगात देव यायचा. लोक सवारिच्या समोर आपल्या समस्या घेवून बसायचे. मग देव त्यावर उतारा सांगायचा. रोज रात्री नदीच्या पाण्यात जावून सवारी थंड व्हायची. शेवटच्या दिवसी भंडारा व्हायचा.
- आपल्या प्रतिक्रीया नोंदविण्या साठीयेण्याची नोंद करा किंवा नविन खाते उघडा
सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.