कामळज भाग - 1: आठवणीतला गाव
कामळज(बुद्रुक) ...... नांदेड शहरापासून पूर्वेला 24 कि.मी. आंतरावर गोदाकाठी वसलेले एक नितांत सुंदर गाव. गावापासून हाकेच्या आंतरावर गोदावरी नदीच विर्स्तिण पात्र. गावाच्या सूरूवातीलाच मारोतीचं जून मंदिर. मंदिराच्या चोहूबाजुला भक्कम दगडी चिरेबंधी पार. पाराच्या चारही कोपर्यावर चार मोठी झाड. त्यातले तीन कडूलिंबाची तर एक चिंचेच विशाल झाड. कधी काळी मंदिराच्या मागे पारावर पिंपळाच मोठ झाड होत म्हणे. गाव असेल आडीचसे ते तीन वस्तीचं. गावाच्या चारही बाजून फिरता येण्यासाठी बैल गाडी जाईल एवढी पांदण.
मारोतीचा पार म्हणजे गावातील सर्व लोकांच एकत्र जमण्याच ठिकाण. सकाळ-संध्याकाळ गप्पा मारण्याचा कट्टा आणि दुपारी निवांत झाडाच्या सावलीत विश्रांती घेण्याच ठिकाण. पाराला लागूनच दक्षिणेला नाटकाचा ओटा. थोडक्यात काय तर गावच ओपन थेअटर. दरवर्षी गावच्या यात्रेची नाटक याच ओट्यावर होत म्हणून नाटकाचा ओटा. नाटकाच्या ओट्याला लागून गावची वेस, वेसेच्या ठिकाणी एक भल मोठ कडूलिंबाच झाड. वेसेपासून 200 मीटर अंतरावर महार वाडा.
गावातंली दुसरी महत्वाची जागा म्हणजे चावडी.. इथ ग्रामपंचायतीच कार्यालय होत. पण सगळेच चावडीला 'वरची चावडी' म्हणून ओळखायचे. गावातील सर्व घरांच बांधकाम हे जून्या पध्द्तीच.. माती आणि दगडाच. गावात ज्या काही तीन चार माड्या होत्या त्यापैकी आमची एक. गावातला मुख्य रस्ता सोडला तर बाकी सगळे रस्ते अरूंदच.
गावतून नदीला जाणारे दोन रस्ते एक 'गाव पाणवढ्याकडे' जाणारा आणि दुसरा 'महार पाणवढ्याकडे'. गावातील बायका या दोन पाणवढ्याचा वापर कपडे धुण्यासाठी करत तर पूरूष जनावरांना पाणी पाजण्यासाठी याचा वापर करत. पूर्वी नांदेडला जाण्यासाठी नदी पार करूनच जाव लागे. तेंव्हा गाव पक्क्या रस्त्यांनी जोडलेल नव्हंत. पावसाळ्यात नदीला पाणी जास्त असे मग नदी पार करण्यासाठी टोकरा वापरावा लागे.
गावापासून उत्तरेला 2 की.मी. अंतरावर श्री दतात्रय प्रभुच देवूळ. हे गावाच आराध्य दैवत. देवूळ टेकडीवर असल्यामूळ आजूबाजूच्या दहा पंधरा कोसाच्या अंतरावरून सहजच दिसे. वर्षानुवर्षाच्या परंपरेनूसार गावातील लोक दर बुधवारी या देवळात देवदर्शनाला जायचे. आजही दरवर्षी चैत्र र्पोणिमेला श्री दतात्रय प्रभुंची पालखी निघते.
- आपल्या प्रतिक्रीया नोंदविण्या साठीयेण्याची नोंद करा किंवा नविन खाते उघडा
सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.