Skip to main content

काकडीचा डोसा

प्रमुखघटक: 

2 वाटी तांदूळ
1 मोठी किसलेली काकडी
आर्धि वाटी खवलेले नारळ
4 हिरव्या मिरच्या
1 इंच आल्याचा तुकडा
कढीपता
चवीनुसार मिठ

वाढणी: 

4 जनासाठी.

पाककृतीला लागणारा वेळ: 

15 मिनिटे.

मार्गदर्शन: 

प्रथम तांदूळ 3 ते 4 तास भिजत ठेवुन घ्यावे. त्यानंतर वरील सर्व साहित्य व भिजलेले तांदूळ मिक्सर मधुन जाडसर दळून पिठ तयार करुन घ्यावे. तवा गसवर मंद आचेवर ठेवून तव्यावर थोडेसे तेल सोडावे. साधारण दीड टेबल स्पून पीठ तव्यावर घेवून चारही बाजूला सम प्रमाणात पसरावे व तव्यावर झाकण ठेवावे. मंद आचेवर डोसा लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा. नंतर डोसा उलटून दुसर्‍या बाजूने भाजून घ्यावा. गरम गरम डोसा लोण्या बरोबर वाढावा.

सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्‍या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.