Skip to main content

कवी नारायण सुर्वे यांचा परिचय

प्रकाशीत विभाग

कवी नारायण सुर्वे यांचा परिचय

जन्म : १९२६

कौटुंबिक आणि पूर्वायुष्य : गंगाराम सुवेर् यांनी सापडलेल्या मुलाला वडिलांची माया आणि नारायण हे नाव दिले - वडील गिरणी कामगार - काही काळ स्वत:ही गिरणीत कामाला त्यामुळे श्रमिकांचे जग जवळून पाहिले- काही काळ शिपाई, प्राथमिक शिक्षक म्हणून नोकऱ्या

१९५६च्या सुमारास काव्यलेखनाला सुरुवात - युगांतर, नवयुग, मराठा या वर्तमानपत्रांतून कविता प्रसिद्ध

१९६२मध्ये 'ऐसा गा मी ब्रह्मा' हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध. या संग्रहातील कविता कुसुमाग्रजांच्या शब्दांत सांगायचे तर 'लढाऊ वृत्तीची, समाजक्रांतीची उपासना करणारी' होती.

'माझे विद्यापीठ' (१९६६) हा दुसरा संग्रह. यात 'ना घर ना गणगोत' अशा स्थितीत 'तांबलेल्या, भाकरीसाठी करपलेल्या' उदास वस्तीच्या पोटासाठी झिजणाऱ्यांचे दाहक विश्व- मिळेल ते काम करणारी माणसे, कामगार, वेश्या, पोस्टर चिकटवणारी पोरं अशा समाजातील 'उपेक्षितां'च्या वेदना सजीव करणारी कविता.

शरच्चंद, विंदा या सुर्व्यांच्या आधीच्या साम्यवादी कवींच्या कवितेतील वास्तवापेक्षा सुर्व्यांच्या कवितेतील वास्तव प्रत्यक्षाला अधिक भिडणारे

'जाहीरनामा' (१९७५), 'सनद' (संपादित निवडक कविता १९८२), 'नव्या माणसाचे आगमन' (१९९५) हे संग्रह प्रसिद्ध.

नारायण सुर्व्यांच्या अप्रकाशित कविता 'नारायण सुवेर् यांच्या गवसलेल्या कविता' या नावाने १९९५मध्ये विजय तापस यांनी संपादित केल्या आहेत.

'माणूस, कलावंत आणि समाज' (१९९२) या संग्रहात त्यांचे वैचारिक लेख, अण्णाभाऊ साठे, कुसुमाग्रज, कुरूंदकर आदींबद्दल काही व्यक्तिचित्रात्मक लेख आणि त्यांच्या मुलाखती यांचा समावेश.

'तीन गुंड व सात कथा', 'दादर पुलाखालची मुले' हे त्यांनी केलेले अनुवाद. तसेच 'कविता श्रमाची', 'गाणी चळवळीची' ही त्यांची संपादित पुस्तके.

संथ, निवेदनात्मक, संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोली भाषेशी जवळीक असणारी, गद्याच्या अंगाने जाणारी अशी विशिष्ट शैली सुर्व्यांनी निर्माण केली.

व्यक्तिगत अनुभव आणि सामाजिक जीवनाशी बांधलेली अशी दुहेरी पिळाची सुर्व्यांची कविता जीवनातील दु:खामागे असलेले, समाजरचनेतील विषमता, हे कारण जाणते. त्यामुळे त्यांच्या कवितेत मार्क्सवादी दृष्टीकोन.

जग बदलून टाकण्याच्या माणसाच्या क्षमतेवरील विश्वास, जीवनातील आव्हाने पेलण्याच्या ताकदीवरील श्रद्धा यातून त्यांच्या कवितेत आशावाद.

मराठी कवितेला मध्यमवगीर्य वर्तुळातून बाहेर काढण्याचे काम सुर्व्यांच्या कवितेने केले.

राज्यभरात गावोगावी जाऊन कवितांचे कार्यक्रम सुर्व्यांनी केले. त्यांच्या कवितेला समाजातील सर्व स्तरांतील लोकांची पसंती मिळाली.

सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्‍या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.