शेतकर्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन देणार पीक म्हणजे आवळा. आवळ्याचा उपयोग जसा दैनंदिन जीवनात खाण्यासाठी केला जातो तसाच तो बर्याचशा ऑषधामध्ये सूध्दा केला जातो. आवळा हे शेतकर्यांना नगदी उत्पन मिळवून देणार पीक आहे.
आवळा लागवडीसाठी जमिनीची निवड:
आवळा लागवडीसाठी हलकी ते भारी, पाण्याचा योग्यप्रमाणात निचरा होणारी, कँल्सियम युक्त जमिन या पिकासाठी योग्य आहे. चुनखडीयुक्त किंवा रेताड जमिनीचा वापर करु नये.
लागवडीसाठी योग्य जाती:
लवकर तयार होणार्या जाती: क्रुष्णा(एनए - 5), बळवंत(एनए-10)
थोड्या उशिरा तयार होणार्या जाती: कांचन(एनाए - 4),अम्रित(एनए - 6)
उशिरा तयार होणार्या जाती: चकैया, निलम (एनए-7)
ह्या पैकी एखाद्या जातीची निवड करावी.
लागवड कसी करावी:
लागवडीसाठी 1 मी. x 1 मी. x 1 मी. आकाराचा खड्डा खोदून घ्यावा. या खड्ड्यात 15 ते 20 किलो शेणखत, दिड किलो सिंगल सुपर फाँस्फेट, 100 ग्रम फाँलिडाँल भुकटी आणि चांगल्या प्रतिची माती यांचे मिश्रण जमिनीपासुन 15 से. मी.उंच इतके भरावे अभिवरुध्दि कलम किंवा डोळे भरुन करावी. या साठी आवळ्याचे बी पावसाळ्यात शेतात लावुन किंवा आवळ्याची पिशवीतील रोपे लावून पूढील वर्षी डोळे भरावेत. यासाठी रोपाचे खोड पेन्सिलाइतक्या जाडीचे झाल्यानंतर आँगस्ट महिण्यात हव्या त्या जातीचे डोळे ठिगळ पध्दतीने भरून घ्यावेत.चांगल्या परागीभवनासाठी दोन जातींची लागवड करावी. दुसऱ्या जातीची लागवड मूळ क्षेत्राच्या किमान दहा टक्के असावी. झाडांच्या योग्य वाढीसाठी वळण देणे आवश्यक आहे.
आवळ्याच्या झाडाला जमिनीपासून एक मीटर उंचीवर पाच ते सहा जोमदार फांद्या योग्य अंतरावर चारही दिशांना विखुरलेल्या स्थितीत वाढतील अशा ठेवाव्यात. खोडावर एक मीटरच्या खाली येणारी फूट काढून टाकावी. फळांचा हंगाम संपल्यावर रोगट, कमजोर, वाळलेल्या फांद्या छाटून टाकाव्यात. आवळ्यामध्ये सुरवातीच्या पाच ते सहा वर्षांपर्यंत आंतरपिके घेता येतात. आवळा बागेत जानेवारी ते फेब्रुवारी पानगळ होत असल्याने या महिन्यात आंतरपिके घेऊ नयेत.
माहितीचा स्त्रोत: विविध शेतिविषयक मासिके
***** प्रमोद नांदुसेकर *****
- आपल्या प्रतिक्रीया नोंदविण्या साठीयेण्याची नोंद करा किंवा नविन खाते उघडा
सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.