Skip to main content

आंतरजालावरचे मराठी लेखन

मजकूर: 

ब्लॉगच्या स्वरूपात आंतरजालावर विविध प्रकारचे मराठी लेखन होत आहे. आपल्या वाचनात आलेल्या अशा लेखनाविषयी इतरांना माहिती देण्यासाठी हा चर्चाविषय सुरू केलेला आहे.

अशी माहिती येथे देताना

तेथले संपूर्ण येथे लेखन उतरवू नये. त्याचा थोडक्यात गोषवारा म्हणून त्यातला एखादा परिच्छेद किंवा कविता असल्यास एकदोन ओळी इतपतच मजकूर येथे प्रतिसादाच्या स्वरूपात लिहावा.
त्याबरोबर मूळ लेखाचा आणि ब्लॉगचा असे दोन्ही दुवे देण्याचीही काळजी घ्यावी.
प्रतिसादाला मूळ लेखाशी सुसंबद्ध असे अर्थपूर्ण शीर्षक द्यावे.

राम नाम सत्य है

राम राम पाव्हणं. काय म्हनता? आज इथं कुणीकडं वाट चुकलात जणू? आता आलात तसे बसा थोडायेळ. अहो, हिरीत कशाला डोकावून बघताय? पाणी असतं होय हल्ली तिथं? उडी मारलीत तर डोस्कं फुटंल राव उगा. पण गुडघापण डुबणार न्हाई तुमचा. इस्वास नाही माज्यावर? हे बगा. डोकीला जखम दिसत्येय न वं? कालच उडी मारली होती हिरीत. खूप लागलंय बगा. अहो राव, पुन्हा हिरीत बगाया लागला तुम्ही? किती वार सांगू पानी न्हाई इथं.
पुढे वाचा...

सिंहासन बत्‍तिशी - कथा पहिली

'राजा, मी तुझ्यावर खूष आहे. मी तुला सांगते ते ऐक' जया पुतळी बोलूं लागली ---

फार फार पूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी उज्जयिनीला राजा भर्तृहरी राज्य करीत होता. त्याच्या राज्यांत एक ब्राह्मण फार तेजस्वी होता. तपस्वी होता. पार्वतीची आराधना करण्यांत त्याला देहाचीही शुद्ध रहात नसे. असे बरेच दिवस गेले. अखेल देवी पार्वती त्याला प्रसन्न झाली व एक सुंदर फळ त्याच्याकडे फेकून म्हणाली, 'वत्सा, मी प्रसन्न आहे. तूं हे फळ खा, म्हणजे अमर होशील ! माझा श्रेष्ठ भक्‍त ठरशील !'
पुढे वाचा...

अस्सल ग्रामीण कथा

60 नंतरच्या मराठी साहित्यकलेचा विचार केल्यास साहित्य संस्कृतीचे केंद्रस्थान शहरी मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग यांच्यापासून विविध जातीजमाती आणि खेडोपाडी प्रसरण पावल्याचे जाणवते. साहित्य निर्मितीमध्ये वास्तववादाचे चित्रण करणे ही प्रेरणा प्रबळ झाली. वास्तवाला थेट भिडणे, समाजवास्तवामागील प्रेरणा, समाजव्यवस्थेमध्ये गुंतलेले हितसंबंध उघड करणे, वर्तमान समाजजीवनात दिसून येणाऱ्या सत्ताकांक्षेचे चित्रण करणे याला साठोत्तरी मराठी साहित्याने महत्त्व दिलेले आहे.
पुढे वाचा...

मना अजाणा.......

आज तू या रोपाच्या समोर कुंडीच्या काठावर डोक टेकून बसला आहेत. आठवतय्‌ ते आधी कुठे होत ? खूप दूर कुठेतरी. खर तर ते रोप पण नव्हत- निव्वळ एक बीज. छे, ते ही नाही ! काहीच नाही !

पुढे वाचा...

मेहंदीच्या पानावर (भाग-४)

लेह-लडाख, सौदर्य काय वर्णावे त्याचे? स्वच्छ निळं आकाश, निळसर हिरव्या पाण्याचे नितळ तलाव, लालसर-पिवळ्या रंगाचे उंचच उंच पर्वत आणि तश्शीच माती. बाईक्स च्या प्रवासात अंगावर उडणाऱ्या त्या पिवळसर मातीने सर्व अंग माखुन गेले होते. राज तर एक नंबरचा माकड दिसत होता.. सो क्युट..

फ्रेश होऊन आल्यावर राजने विचारले -”गेला का रंग सगळा मातीचा?”, मला तर म्हणावेसे वाटत होते की “वेड्या तो रंग तर केंव्हाच गेला, पण मनावर चढलेला तुझा रंग जातंच नाहीये“
पुढे वाचा...

मेहंदीच्या पानावर (भाग-३)

रात्रभर अखंड वाहीलेल्या आश्रुंनी भिजलेली उशी सकाळी गार पडली होती. सकाळी अंथरूणातुन उठायचाच कंटाळा आला होता.. उशी उराशी कवटाळुन खुप वेळ लोळत पडले. पण शेवटी मी थांबल्याने क्षण थोडे नं थांबणार होते? पटापट आवरुन खाली आले. पार्कींग मध्ये उभ्या असलेल्या MH-01 नंबराच्या आलीशान गाडीने माझे लक्ष वेधुन घेतले. महाराष्ट्राची गाडी? इकडे?? उत्सुकतेने रजिस्टर चाळला आणि आश्चर्याचा धक्काच जणु बसायचा बाकी होता. ‘राज’ च्या नावावर दोन रुम्स बुक्ड पाहुन मी थक्कच झाले. शेरसिंगला विचारले तसे त्याने बाहेर गार्डनमध्ये बसलेल्या एका इसमाकडे बोट दाखवले. मी थोडी धावतचं.. थोडी भरभर चालत बाहेर पोहोचले आणि राजला तिथे बघुन अक्षरशः थिजुन गेले.
पुढे वाचा...

मेहंदीच्या पानावर (भाग-२)

२८ डिसेंबर
दोन दिवस मी घरीच बसुन होते. कुठे जाण्याचा मुडच नव्हता. २६ च्या पेपरमध्ये राज च्या ऐंन्गेजमेंटबद्दल बातम्या झळकुन गेल्या.

त्या दिवशीचे अनेक लोकांचे चेहरे मला अजुनही आठवत होते. आशु म्हणाली होती ते खरंच होतं. माझ वागणं इतक ऑब्व्हियस होतं की सगळ्यांनाच राज बद्दल मला वाटणारे आकर्षण, प्रेम माहीती झाले होते. माझ्या चेहऱ्यावर कोसळलेल्या दुःखाचे कुणाला खरंच वाईट वाटले तर कुणाला फिदीफिदि हसायला कारणंच मिळाले. कुणी सहानभुती दाखवली तर कुणी आडुन-आडुन का होईना थट्टा करुन घेतली. आता हा विषय निदान काही आठवडे तरी चघळला जाणार यात काहीच शंका नव्हती.
पुढे वाचा...

मेहंदीच्या पानावर (भाग-१)

आज स्टुडीओ मध्ये आशु जोऱ्रात ओरडलीच “अग्गं हात सोडं.. कित्ती जोरात दाबती आहेस..” त्याला कारणही तस्सच होतं ‘राज’ स्ट्युडीओ मध्ये अचानकपणे आला होता, त्याचे आज रेकॉर्डींग नसताना त्याचे अनपेक्षीतपणे येणं त्याला अनपेक्षीतपणे बघणं माझ्यासाठी एक सुखःद धक्काच होता. त्याचे थोडीशी निळसर छटा असलेले डोळे, नेहमीच चेहऱ्यावर असणारी ति स्माईल, आपल्या चेहऱ्यावर आपसुकच हास्य पसरवणारी त्याची बोलताना डोळे मिचकावुन बोलण्याची पध्दत आणि कष्टाने कमावलेली शरीरयष्टी सर्वच काही छान होते.. मी पुर्ण फिदा होते त्याच्यावर. आणि त्याचा आवाज.. माय गॉड.. अंगावर हजारो गुलाबाच्या पाकळ्यांची बरसात केल्यासारखे वाटते. उगाच नाही तो आघाडीचा गायक आहे, मीच काय कित्तेक मुली त्याच्यावर फिदा असतील. अर्थात मला हे काही वेगळं सांगायची गरज नाही. गेल्या सहा महीन्याची माझ्या डायरीची पानं तुम्ही चाळलीत तरी तुमच्या आपसुकच लक्षात येईल.
पुढे वाचा...

एकदा लग्न झालं की !!!!

एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...
असा वाटण्याची जागा मग,
मूल झालं की...
मोठं घर झालं की...
अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते.
दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत. ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल, अशी आपण मनाची समजूत घालू लागतो.
पुढे वाचा...

फारच छान

फारच उत्तम

सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्‍या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.