सेक्यूलर बनण्याचे ६५० उपाय
लेखक- जयेश मेस्त्री
"आज भारतात ’धर्मनिरपेक्षवाद’ नावाचा अजून एक धर्म अस्तित्वात आला आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्यूलरिझम. पण सेक्यूलर हा शब्द अर्थहीन आहे. कारण एक राज्य सेक्यूलर असू शकतं. पण एक व्यक्ती नाही. एक व्यक्ती हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, बुद्धिवादी किंवा नास्तिक असू शकते पण सेक्यूलर नाही. जर कुणी स्वताला सेक्यूलर म्हणवून घेत असेल तर ती एक विकृती आहे."
हे खडे बोल आहेत, हिंदू वॉइसचे संपादक पी दैवमुथु यांचे.